IND vs ENG T20I And ODI Series 2025: भारतीय क्रिकेट संघासाठी 2024 हे वर्ष संमिश्र वर्ष ठरले. त्यानंतर 2025 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता घरच्या मैदानावर टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. भारतीय संघ वर्षातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ब्लॉकबस्टर सामने पाहायला मिळणार आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. इंग्लंडचा संघ पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. इंग्लंडनेही टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारताने अद्याप आपला संघ घोषित केलेला नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार टी-20 आणि वनडे मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिले पाच टी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे टी-20 मालिकेचे सामने होणार आहेत. तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होणार आहेत. 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान टी-20 मालिका होणार आहे. यानंतर 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान वनडे मालिका खेळवली जाईल. टी-20 मालिकेचे सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.
भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक
22 जानेवारी- पहिला टी-20 सामना, कोलकाता (सायंकाळी 7 नंतर)
25 जानेवारी - दुसरा टी-20 सामना, चेन्नई (सायंकाळी 7 नंतर)
28 जानेवारी- तिसरा टी-20 सामना, राजकोट (सायंकाळी 7 नंतर)
31 जानेवारी- चौथा टी-20 सामना, पुणे (सायंकाळी 7 नंतर)
2 फेब्रुवारी – पाचवा टी-20 सामना, मुंबई (सायंकाळी 7 नंतर)
भारत आणि इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
6 फेब्रुवारी – पहिली वनडे सामना, नागपूर (दुपारी 1.30 नंतर)
9 फेब्रुवारी - दुसरी वनडे सामना, कटक (दुपारी 1.30 नंतर)
12 फेब्रुवारी- तिसरा वनडे सामना, अहमदाबाद (1:30 नंतर)
भारताविरुद्ध इंग्लंडचा टी-20 संघ - जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.
भारताविरुद्ध इंग्लंडचा एकदिवसीय संघ - जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कारसे, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.