टी-20 विश्वचषक स्पर्धा 2021 ( T-20 2021 World Cup) भारतात आयोजित केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट बार्ड (BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रलिया (CA) यांच्यात झालेल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक व्हर्च्युल पद्धतीने पार पडली. नियोजीत वेळापत्रकानुसार ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार होती. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, स्पर्धेचे यजमानपद स्वीकारण्यास भारताने होकार दिला.
प्राप्त माहितीनुसार, नियोजित वेळापत्रक असे होते की, टी-20 विश्वचषक स्पर्धा 2020 ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार होती. तर याच स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये 2022 या वर्षासाठी केले जाणार होते. मात्र, 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोना व्हायरस संकटामुळे संपूर्ण जगासाठीच त्रासदायक ठरले. परिणामी यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा 2020 रद्द करण्यात आली. दरम्यान, आता टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित केली जाणार आहे.
The International Cricket Council (ICC) today confirmed that the ICC Men’s T20 World Cup 2020 that was postponed due to COVID-19 will be held in Australia in 2022. India will host the ICC Men’s T20 World Cup 2021 as planned: ICC pic.twitter.com/MFxeYIAqBW
— ANI (@ANI) August 7, 2020
खरे तर टी-20 विश्वचषक स्पर्धा 2020 ऑस्ट्रेलियामध्ये 18 ऑक्टोबर पासून सुरु होणार होती. मात्र, कोरोनामुळे क्रीडा विश्वाचे सर्वच गणित बिघडले आणि ही स्पर्धा रद्द करावी लागली.