दीपक चाहर (Photo Credit: Getty Images)

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने तीन दिवसात दुसरी हॅट्रिक घेऊन सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. भारत-बांगलादेश यांच्यात दोन दिवसांपूर्वी तिसरा टी-२० सामना नागपूर येथे खेळला गेला होता. या सामन्यात दिपक चहर याने उत्तर कामगिरी करत सलग ३ चेंडूत बांग्लादेशच्या ३ फलंदाजाला माघारी धाडले होते. यातच विदर्भविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये राजस्थान (Rajasthan) संघाकडून खेळत असताना विदर्भसंघाविरुद्ध त्याच्या कारकिर्दितील दुसरी हॅट्रिक घेऊन सर्वोकृष्ट प्रदर्शन करुन दाखवले आहे. यामुळे दीपक चाहर याचे संपूर्ण देशातून तोंडभरून कौतूक केले जात आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दिपकचहर याने जोरदार प्रदर्शन करुन भारतीय चाहत्यांचे मन जिंकले आहे. चहरच्या घातक गोलंदाजीमुळे विदर्भाचा संघ 13 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 99 धावा करू शकला. चाहरने 18 धावा देत 6 च्या इकॉनॉमीने चार विकेट्स घेतल्या. विदर्भ संघ दीपकच्या घटक गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. यातच दीपक चहरने दुसरी हॅट्रिक घेऊन क्रिकेट विश्वात आपली स्वत:ची छाप सोडली आहे.

बीसीसीआयचे ट्विट-