इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चा 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी 7.30 पासून हा सामना खेळला जाईल. दोन्ही संघांमधील या मोसमातील ही पहिलीच भेट असेल. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा करा किंवा मरो असा सामना असेल. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या 13व्या सामन्यात खेळतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 6 सामने आणि सनरायझर्स हैदराबादने 4 सामने जिंकले आहेत. (हे देखील वाचा: SRH vs RCB Head to Head: आज हैदराबाद आणि बंगळुरूची होणार टक्कर, जाणून घ्या कोण आहे वरचढ)
सर्वांच्या नजरा असतील या खेळाडूंवर
हेनरिक क्लासेन
या स्पर्धेत आतापर्यंत हेनरिक क्लासेनने 10 डावात 326 धावा केल्या आहेत. हेनरिक क्लासेनने 46 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. हेन्रिक क्लासेन अतिशय चांगल्या लयीत दिसतो.
मार्को जॅनसेन
सनरायझर्स हैदराबादने या स्पर्धेत आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. तो फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. या सामन्यातही सनरायझर्स हैदराबाद संघाकडून चांगला पर्याय असेल.
मयंक मार्कंडे
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. मयंक मार्कंडेने आतापर्यंत एकूण 12 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातही मयंक मार्कंडे आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवू शकतो.
फाफ डु प्लेसिस
आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. फाफ डू प्लेसिसने या स्पर्धेत आतापर्यंत 12 सामन्यांत 631 धावा केल्या आहेत. या सामन्यात संघाला फाफ डू प्लेसिसकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.
विराट कोहली
विराट कोहली हा आरसीबी संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत आतापर्यंत विराट कोहलीने 6 अर्धशतकांसह 438 धावा केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहली आपल्या बॅटने खळबळ माजवू शकतो.
ग्लेन मॅक्सवेल
आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल हा अतिशय स्फोटक शैलीचा फलंदाज आहे. या स्पर्धेत आतापर्यंत ग्लेन मॅक्सवेलने 12 सामन्यात 384 धावा केल्या आहेत आणि 3 बळी घेतले आहेत. या सामन्यातही ग्लेन मॅक्सवेल वेगवान धावा करू शकतो.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद: अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, ग्लेन फिलिप्स/हॅरी ब्रूक, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडे, फजलहक फारुकी/मार्को जॉन्सन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, अनुज रावत, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.