
SRH vs RR, IPL 2025 2nd T20: आज आयपीएल 2025 चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. आयपीएल 2025 च्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थानचा संघ 20 षटकात 6 गडी गमावून 242 धावा करु शकला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागच्या हाती होते. तर, हैदराबादसाठी पॅट कमिन्स ही भूमिका बजावतोय.
Rajasthan Royals put up their highest-ever IPL total, but the target was just too big.
Scorecard: https://t.co/NqpliiKtPX | #SRHvRR #IPL2025 pic.twitter.com/QKJKXtPQQ8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 23, 2025
इशान किशनने झळकावले शानदार शतक
सनरायझर्स हैदराबादने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या आहेत. हैदराबादकडून इशान किशनने नाबाद शतक झळकावले आहे. त्याने 47 चेंडूत 106 धावा केल्या आहेत. इशानने 11 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावा केल्या. त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. नितीश रेड्डी यांनी 30 आणि क्लासेन यांनी 34 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे व्यतिरिक्त महेश थीकशनाने दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाचे दोन फलंदाज केवळ 24 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत सहा विकेट गमावल्यानंतर केवळ 242 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्सकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. तसेच संजू सॅमसनने जलद 66 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून सिमरजीत सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिमरजीत सिंग आणि हर्षल पटेल यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.