
Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघ आतापर्यंत संघर्ष करत असल्याने हा लीग टप्प्यातील एक अतिशय महत्त्वाचा सामना असेल. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील. अशा परिस्थितीत, आजचा सामना 'करो या मरो' असेल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (SRH vs CSK Head to Head)
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 21 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी सीएसकेने 15 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 6 वेळा विजय मिळवला आहे. 2024 मध्ये दोन्ही संघ दोनदा एकमेकांसमोर आले. सीएसकेने एक सामना 78 धावांनी जिंकला, तर सनरायझर्स हैदराबादने दुसरा सामना 8 विकेट्सने जिंकला. (हे देखील वाचा: Chennai vs Hyderabad Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि हैदराबादची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघाच्या आकेडवारीवर एक नजर)
सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
शिवम दुबे: चेन्नई सुपर किंग्जचा स्फोटक फलंदाज शिवम दुबेने गेल्या 10 सामन्यांमध्ये 379 धावा केल्या आहेत. यादरम्यान, शिवम दुबेने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शिवम दुबेची आक्रमक फलंदाजी सीएसकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
रवींद्र जडेजा: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने 349 धावा केल्या आहेत. या काळात रवींद्र जडेजाने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर रवींद्र जडेजा स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.
नूर अहमद: चेन्नई सुपर किंग्जचा घातक गोलंदाज नूर अहमदने गेल्या आठ सामन्यांमध्ये आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, नूर अहमदने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये नूर अहमदची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते. गेल्या सामन्यात नूर अहमदने घातक गोलंदाजी केली होती.
अभिषेक शर्मा: सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने गेल्या 10 सामन्यांमध्ये 431 धावा केल्या आहेत. या काळात अभिषेक शर्माने 179.32 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी एसआरएचसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
हेनरिक क्लासेन: सनरायझर्स हैदराबादचा घातक फलंदाज हेनरिक क्लासेनने 347 धावा केल्या आहेत. या काळात, हेनरिक क्लासेनने 61 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जर हेनरिक क्लासेन स्थिरावला तर तो विरोधी गोलंदाजांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतो.
मोहम्मद शमी: एसआरएचचा घातक फलंदाज मोहम्मद शमीने आतापर्यंत 9 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, मोहम्मद शमीने 7.44 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हर्समध्ये मोहम्मद शमीची गोलंदाजी विरोधी संघांचे कंबरडे मोडू शकते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी आणि इशान मलिंगा.
सनरायझर्स हैदराबाद : शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना.