Sunil Gavaskar On Rishabh Pant: ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Boder-Gavaskar Trophy 2024-25) खूप फ्लॉप ठरला आहे आणि त्याला एकदाही 50 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो एकटा धावा करत क्रीजवर टिकू शकला नाही. पंतने मेलबर्नमध्ये ज्या प्रकारे विकेट गमावली त्यामुळे अनुभवी सुनील गावसकर (Sunil Gavaskar) अजिबात खुश दिसत नव्हते. (हे देखील वाचा: India’s WTC Final Scenarios: मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव किंवा सामना ड्रॉ झाला तर, डब्ल्यूटीसी फायनलसाठी कसा ठरेल पात्र? समजून घ्या संपूर्ण गणित)
खराब शॉट खेळून पंत झाला बाद
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतला चांगली सुरुवात झाली, पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. जेव्हा तो 28 धावा करून खेळत होता. त्यानंतर त्याने स्कॉट बोलँडच्या चेंडूवर विकेटच्या मागे एक विचित्र शॉट खेळला. तो या शॉटला नीट वेळ देऊ शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटच्या टोकाला लागून खूप वर गेला, त्यानंतर नॅथन लायनने अतिशय सोपा झेल घेतला. अशाप्रकारे तो 28 धावा करून बाद झाला.
"Stupid, stupid, stupid!" 😡
🏏 Safe to say Sunny wasn't happy with Rishabh Pant after that shot.
Read more: https://t.co/bEUlbXRNpm
💻📝 Live blog: https://t.co/YOMQ9DL7gm
🟢 Listen live: https://t.co/VP2GGbfgge #AUSvIND pic.twitter.com/Fe2hdpAtVl
— ABC SPORT (@abcsport) December 28, 2024
सुनील गावस्कर संतापले
ऋषभ पंत संघाला सोडचिठ्ठी देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. खराब शॉट खेळून बाद झाल्यानंतर महान फलंदाज सुनील गावस्कर संतापले आणि म्हणाले की, दोन क्षेत्ररक्षक आहेत आणि मग तुम्ही असे फटके मारता. आपण मागील शॉट चुकला असताना. येथे तुम्ही विकेट फेकून दिलीत. हा तुमचा नैसर्गिक खेळ आहे असे सांगून तुम्ही सुटू शकत नाही. माफ करा हा तुमचा नैसर्गिक खेळ नाही. हा एक वाईट शॉट होता. त्यांनी दुसऱ्या ड्रेसिंग रूममध्ये जावे.
ऋषभ पंत वाईटरित्या फ्लॉप
ऋषभ पंतने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याने आपल्या बॅटने 37, 1, 21, 28, 9 आणि 28 धावा केल्या आहेत आणि त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. टीम इंडियाच्या यष्टिरक्षकाची जबाबदारीही तो पार पाडत आहे. तर युवा फलंदाज ध्रुव जुरेल बेंचवर बसला आहे. त्याला पर्थमध्ये खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्यानंतर त्याला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.