Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला 18 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. आज सामन्याचा तिसऱ्या दिवसाच्या खेळाला 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जातोय. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 305 धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 72 षटकांत 4 गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि केन विल्यमसन यांनी अर्धशतकी खेळी खेळली. लॅथमने 70 आणि केन विल्यमसनने 55 धावा केल्या.
सध्या किवी संघ श्रीलंकेपेक्षा 50 धावांनी मागे
सध्या किवी संघ श्रीलंकेपेक्षा 50 धावांनी मागे आहे. पाहुण्या संघासाठी डॅरिल मिशेलने 60 चेंडूत 41 धावा केल्या असून टॉम ब्लंडेल 41 चेंडूत 18 धावा करून नाबाद आहे. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने दोन विकेट घेतल्या. याशिवाय रमेश मेंडिस आणि प्रभात जयसूर्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगूया की भारतात श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचे अधिकृत प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Ten 1 SD/HD वर पाहता येईल. याशिवाय FanCode ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मात्र यासाठी चाहत्यांना वर्गणी घ्यावी लागणार आहे.
श्रीलंका प्लेइंग 11: दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.
न्यूझीलंड प्लेइंग 11: टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओ'रुर्के.