Sri lanka vs Australia Test Series 2025: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत स्टीव्ह स्मिथला संघाचा कर्णधार ( Steve Smith Australia Captain)बनवण्यात आले आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) संघाबाहेर आहे. याशिवाय, त्याला पायाला त्रास देखील जाणवत आहे. उपचारांसांठी त्याला आराम देण्यात आला आहे. त्याच्या स्मिथकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तयामुळे स्मिथ 7 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणार आहे.
7 वर्षांनी संपूर्ण मालिकेचा कर्णधार
2018 मध्ये सॅंडपेपर घोटाळ्यात दोषी आढळल्यानंतर स्टीव्ह स्मिथला 12 महिन्यांसाठी कोणत्याही संघाचे नेतृत्व करण्यास बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याने दोनदा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले आहे. 2021 मध्ये, कोविड-19 मुळे कमिन्स उपलब्ध नसताना त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले. यानंतर, 2023 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान, आईच्या अचानक निधनामुळे कमिन्सला ऑस्ट्रेलियाला परतावे लागले. त्यानंतर स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. तथापि, दोन्ही वेळा त्याला एक किंवा दोन सामन्यांसाठी संधी देण्यात आली. श्रीलंका दौऱ्यावर, 7 वर्षांत प्रथमच, तो संपूर्ण मालिकेसाठी संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
संघाची घोषणा
श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि दुसरा सामना 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाईल. यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्ध नुकतेच पदार्पण करणारे सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी आणि ब्यू वेबस्टर यांना या दौऱ्यावर स्थान देण्यात आले आहे. श्रीलंका संघात फिरकीपटूंचे वर्चस्व आहे, त्यामुळे नॅथन लायनसह, मर्फी आणि कुहनेमन या आणखी दोन तज्ज्ञ फिरकीपटूंचीही निवड करण्यात आली आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), सॅम कॉन्स्टास, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, टॉड मर्फी, नॅथन लायन, नॅथन मॅकस्वीनी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, कूपर कॉनोली.