Sri Lanka National Cricket Team vs Australia National Cricket Team 2nd Test 2025: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka vs Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Galle International Stadium) खेळला जाईल. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला आणि कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तथापि, आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, धनंजय डी सिल्वाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील हा कसोटी सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिकंली आहे. ते पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. (India vs England, 1st ODI Match Winner Prediction: इंग्लंडला हरवून मालिकेत आघाडी घेण्याच्या उद्देशाने टीम इंडिया नागपूर एकदिवसीय सामन्यात उतरेल; जाणून घ्या विनर प्रेडिक्शन)
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज 6 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता गॅले येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
श्रीलंकेने नाणेफेक जिकंली
Sri Lanka win the toss and will bat first in Galle 👀#SLvAUS pic.twitter.com/hMEXWVUmsz
— 7Cricket (@7Cricket) February 6, 2025
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निस्सांका (तंदुरुस्तीवर आधारित), ओशादा फर्नांडो, लाहिरू उदारा, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, सोनल दिनुशा, प्रभात जयसूर्या, जेफ्री वँडरसे, निशान पेरीस, असिता फर्नांडो, विश्वा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टॅस्क, मॅट कुह्नेमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर