Photo Credit- X

New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, 3rd ODI Match 2025: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज 11 जानेवारी रोजी खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जात आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडपुढे श्रीलंकेचे 291 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जानिथ लियानागे, पथुम निस्सांका आणि कुशल मेंडिस यांची अर्धशतकी खेळी खेळली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असलंका करत आहे. येथे पहा सामन्याचे स्कोअरकार्ड

 तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडपुढे श्रीलंकेचे 291 धावांचे लक्ष्य

दोन्ही संघांचे खेळाडू

न्यूझीलंड: विल यंग, ​​मार्क चॅपमन, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर (कर्णधार), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), जेकब डफी, मॅट हेन्री, विल ओ'रोर्क, नॅथन स्मिथ/मायकेल ब्रेसवेल.

श्रीलंका: पथुम निस्सांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरिथ असलंका (कर्णधार), कामिंदु मेंडिस, दुनिथ वेलागे, वानिंदु हसरंगा, जेफ्री वँडरसे, असिता फर्नांडो, लाहिरु कुमारा, जानिथ लियानागे.