England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 6 सप्टेंबरपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व ओली पोप करत आहेत तर श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेच्या संघाने 45 षटकांत पाच गडी गमावून 211 धावा केल्या होत्या. कर्णधार धनंजय डी सिल्वा 64 आणि कमिंडू मेंडिस 54 धावा करत खेळत होते. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 61.2 षटकात 263 धावांवरच मर्यादित राहिला. श्रीलंकेचा संघ अजूनही 62 धावांनी मागे आहे. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक 69 धावांची खेळी खेळली. धनंजय डी सिल्वाशिवाय कमिंडू मेंडिसने 64 आणि सलामीवीर पाथुम निसांकानेही 64 धावा केल्या. इंग्लंडकडून ऑली स्टोन आणि जोश हलने प्रत्येकी तीन बळी घेतले. ऑली स्टोन आणि जोश हल यांच्याशिवाय ख्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या.
Sri Lanka lose 5 for 43, England claim a 62-run first-innings lead!https://t.co/wXld9D8ss6 | #ENGvSL pic.twitter.com/BybK9kVF4U
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 8, 2024
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड पहिल्या डावात फलंदाजीला उतरला आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. कर्णधार ऑली पोपने पहिल्या डावात इंग्लंडकडून 154 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली.
या खेळीत ओली पोपने दोन षटकार आणि 19 चौकार लगावले. पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 69.1 षटकात 325 धावा करत सर्वबाद झाला. ऑली पोपशिवाय बेन डकेटने 86 धावा केल्या. श्रीलंकेकडून मिलन प्रियनाथ रथनायकेने सर्वाधिक तीन बळी घेतले. मिलन व्यतिरिक्त प्रियनाथ रथनायके, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो आणि कर्णधार धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हन जाहीर केले होते. इंग्लंडने युवा जोश हलचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.