Sri Lanka बोर्डावर टीका करणे Bhanuka Rajapaksa याला पडले महागात, बंदीची कारवाई करत बोर्डाने ठोठावला लाखो रुपयांचा दंड
भानुका राजपक्षे (Photo Credit: Instagram)

भारतीय संघ (Indian Team( सध्या एकदिवसीय आणि टी -20 मालिकेसाठी श्रीलंका दौर्‍यावर  (Sri Lanka Tour) आहे. परंतु मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या क्रिकेट संघात नवीन गदारोळ सुरू झाला आहे. श्रीलंकन बोर्डाने डावखुरा फलंदाज भानुका राजपक्षेवर (Bhanuka Rajapaksa) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून एक वर्षासाठी बंदी घातली आहे. तसेच 5000 यूएस डॉलर म्हणजेच 3.71 लाख रुपये दंड ठोठावला आहे. मात्र, त्याची बंदी दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे म्हणजे त्वरित प्रभावाने त्यांच्यावर बंदी घातली जाणार नाही. पण येत्या काळात त्याची बंदी लागू होईल. अशास्थितीत राजपक्षेला भारताविरुद्ध मालिकेच्या प्रशिक्षण संघात स्थान देण्यात आले असून त्याला संघातही घेतले जाऊ शकते असे वर्तवले जात आहे. (IND vs SL Series 2021: श्रीलंकेत इंट्रा-स्क्वाड सामन्यात भारतीय खेळाडूंनी दाखवला दम, शिखर धवन-भुवनेश्वर कुमार आले आमनेसामने)

एसएलसीने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “सामाजिक आणि अन्य माध्यमांच्या मुलाखतींमध्ये हजेरी लावत 2019/2020 खेळाडूंच्या कराराचे उल्लंघन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावर त्याला 5,000 अमेरिकी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.” या दरम्यान, राजपक्षेला भविष्यातील दौर्‍यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बायो-बबल अंतर्गत 13 सदस्यांच्या संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राजपक्षेने आवश्यक फिटनेस पास केल्यावर हा निर्णय घेण्यात आला, जो राष्ट्रीय निवडीची पूर्वअट आहे. श्रीलंकन प्रमुख संघांकडून खेळण्यासाठी त्याच्याकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने राजपक्षे विरोध करत आहेत, त्याने अलीकडेच इंग्लंड दौर्‍यासाठी श्रीलंकेच्या संघात सहभागी व्हायला हवे ते असे सुचवले होते, अशी माहिती ESPNcricinfo ने दिली.

इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका संघ पूर्णपणे अपयशी ठरला आणि ते एकही सामना जिंकू शकले नाही परिणामी टी-20 मालिकेत 3-0 आणि अखेरीस वनडे मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर श्रीलंका तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला टक्कर देईल. 13 जुलै रोजी वनडे मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल. यासह काही श्रीलंकेच्या खेळाडूंचा बोर्डाशी देखील वाद सुरु आहे. निषेध म्हणून पाच खेळाडूंनी भारताविरुद्ध मालिकेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे.