चैरिथ असलांका (Photo Credits: Twitter)

Sri Lanka National Cricket Team vs West Indies National Cricket Team 2nd ODI Match Scorecard:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले (Pallekele)  येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium)  खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती आहे. तर शाई होप वेस्ट इंडिजचे कर्णधार आहे.  (हेही वाचा  - SL vs WI 2nd ODI 2024 Key Players: श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'हे' खेळाडू करु शकतात कहर, आपल्या घातक खेळीने बदलू शकतात सामन्याचा मार्ग )

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसामुळे सामन्याचा निर्णय 44-44 षटकांचा झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 58 धावा करून संघाचे आठ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. शेरफेन रदरफोर्ड वगळता एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 44 षटकात केवळ एक धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून शेरफेन रदरफोर्डने 80 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. शेरफेन रदरफोर्डशिवाय गुडाकेश मोतीने नाबाद 50 धावा केल्या. महेश थेक्षानाने श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगाशिवाय महेश थेक्षाना आणि असिथा फर्नांडोने प्रत्येकी तीन बळी घेतले.

पाहा पोस्ट -

हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 44 षटकात 190 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 25 धावांवर संघाला दोन मोठे धक्के बसले. श्रीलंकेच्या संघाने अवघ्या 38.2 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार चारिथ असलंकाने पुन्हा एकदा श्रीलंकेसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली.

चरित असलंकाने अवघ्या 61 चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 62 धावांची उत्कृष्ट खेळी केली. चरित असलंका व्यतिरिक्त सदिरा समरविक्रमा आणि निशान मदुष्का यांनी 38-38 धावा केल्या. अल्झारी जोसेफने वेस्ट इंडिज संघाला पहिले यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक दोन बळी घेतले. अल्झारी जोसेफशिवाय गुडाकेश मोती आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना शनिवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.