सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

SRH vs RR, IPL 2020: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलच्या चौथ्या डबल-हेडरचा पहिला सामना खेळला जात आहे. आजच्या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 158 धावा केल्या आणि सलग पाचवा पराभव टाळण्यासाठी रॉयल्सपुढे विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य ठेवले. सनरायझर्ससाठी आजच्या सामन्यात मनीष पांडेने (Manish Pandey) यंदाच्या आयपीएलमधील (IPL) दुसरे धडाकेबाज अर्धशतक ठोकले आणि 54 धावा केल्या. कर्णधार डेविड वॉर्नरचे (David Warner) अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले आणि तो 48 धावांवर बाद झाला. जॉनी बेयरस्टोने 16 धावा केल्या. दुसरीकडे, रॉयल्ससाठी कार्तिक त्यागी, जयदेव उनाडकट आणि जोफ्रा आर्चर यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. (SRH vs RR, IPL 2020: डेविड वॉर्नरचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, राजस्थान रॉयल्समध्ये बेन स्टोक्सची एंट्री)

वॉर्नर आणि बेअरस्टोच्या जोडीने हैदराबादकडून डावाची सुरुवात केली. दोघांनी 4 ओव्हरमध्ये 13 धावा करुन संथ सुरूवात केली. युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने हैदराबादला 4.4 ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला आणि बेअरस्टोला बाउंड्री लाईनवर सजू सॅमसनकडे झेलबाद करून 16 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर 48 धावा करून टिकून खेळणाऱ्या वॉर्नरला आर्चरने बोल्ड केले. 18व्या ओव्हरमध्ये उनाडकटने सनरायजर्सला तिसरा धक्का दिला आणि 54 धावांवर खेळणाऱ्या मनीष पांडेला राहुल तेवतियाकडे झेलबाद केले. मनीषने 40 चेंडूत यंदाच्या स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले. अखेर हैदराबादकडून केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग नाबाद धावा करून परतले.

दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी दोन्ही टीम काही बदलांसज मैदानावर उतरले आहेत. राजस्थान संघात रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स आणि रायन पराग यांचा संघात समावेश आहे असून यशस्वी जयस्वाल, महिपाल लोमरोर आणि अँड्र्यू टाय यांना बाहेर बसवले. हैदराबाद संघात अब्दुल समदच्या जागी विजय शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.