SRH vs RCB IPL 2021: आयपीएल (IPL) 14 च्या सातव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) फलंदाजीक्रम गडगडला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात आरसीबीने (RCB) पहिले फलंदाजी करत 8 विकेट 149 गमावून धावा केल्या आणि सनरायझर्स हैदराबादपुढे (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 150 धावांचं लक्ष्य दिलं आहे. रॉयल चॅलेंजर्ससाठी ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वाधिक 59 धावा केल्या. मॅक्सवेलने धावा तर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 33 धावांचे योगदान दिले. शिवाय, शाहबाझ अहमद 14 आणि देवदत्त पडिक्क्ल 11 धावाच करू शकले. एबी डिव्हिलियर्स आणि डॅनियल ख्रिश्चन एकेरी धाव करून माघारी परतले. न्यूझीलंडचा तडाखेबाज काईल जेमीसन 12 धावा करून परतला. दुसरीकडे, हैदराबादच्या गोलंदाजांनी आज चमकदार कामगिरी केली व आरसीबीच्या घातक फलंदाजांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. जेसन होल्डरने 3 तर राशिद खान ने 2 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, शाहबाझ नदीम आणि टी नटराजनला 1 विकेट मिळाली. (SRH vs RCB IPL 2021 Match 6: डेविड वॉर्नरने जिंकला टॉस, हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; Devdutt Padikkal याचा आरसीबी प्लेइंग XI मध्ये समावेश)
टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेले रॉयल चॅलेंजर्स फलंदाज मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. हैदराबाद गोलंदाजांनी मागील सामन्यातील आपला खेळ सुधारला व बेंगलोर संघाला नियमित अंतराने झटके दिले. आरसीबीकडून विराट आणि पडीक्कलने डावाची सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच ओव्हरमध्ये भुवनेश्वरने पडीक्कलला तंबूचा मार्ग दाखवला. काही अंतरानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाझ अहमदही बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बेंगलोरला सावरले पण दोनघे संघाला शतकी धावसंख्येचा जवळ नेत असताना होल्डरने विराटचा काटा काढला. विराटनंतर डिव्हिलियर्स मैदानात आला, मात्र, राशिदने त्याला स्थिरावण्याची संधीच दिली नाही आणि वॉर्नरकडे झेलबाद केले. संघाकडून मॅक्सवेल एकटा धावांची झगडत राहिला, पण अखेरपर्यंत त्याला सेट फलंदाजाची साथ मिळाली नाही. मॅक्सवेलची खेळी बेंगलोरसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. विशेष म्हणजे मॅक्सवेलने 2016 नंतर पहिले आयपीएल अर्धशतक झळकावले आहे.
FIFTY!
The much awaited half-century for @Gmaxi_32 👏👏. This one comes after the 2016 edition of #VIVOIPL.
Live - https://t.co/kDrqkM24yz #SRHvRCB #VIVOIPL pic.twitter.com/BByV7taJmi
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2021
दरम्यान, दोन्ही संघाने आजच्या सामन्यासाठी मागील मॅचमधील प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. आरसीबी संघात देवदत्त पडिक्क्लचे पुनरागमन झाले तर हैदराबादने मोहम्मद नबी आणि संदीप शर्मा यांच्या जागी जेसन होल्डर आणि शाहबाझ नदीमचा समावेश केला आहे.