Sania Mirza (Photo Credits: Sania Mirza/Instagram)

SRH vs CSK, IPL 2019: काल (17 एप्रिल) सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या रंगलेल्या सामन्यात हैद्राबादने चेन्नईवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. डेव्हिड वॉर्नर (50) आणि जॉनी बेअरस्टो (61*) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैद्राबादला सामन्यात विजय मिळवणे शक्य झाले. त्याचबरोबर गोलंदाजांची उत्तम साथही लाभली.

प्रथम नाणेफेक जिंकत चेन्नईने 132 धावात 5 बाद अशी खेळी केली. त्यामुळे हैद्राबादसमोर 133 धावांचे लक्ष्य होते. हे सोपे आव्हान साध्य करणे हैद्राबाद संघाला सहज शक्य झाले.

विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी टेनिसपटू सानिया मिर्झा उपस्थित होती. मूळची हैद्राबादची असलेली सानिया यावेळेस सनरायजर्स हैद्राबाद संघाला चिअर्स करताना दिसली. इतकंच नाही तर तिने हैद्राबाद संघाला पाठिंबा देण्याचे आवाहनही प्रेक्षकांना केले आहे. सानियाचा हा व्हिडिओ खुद्द हैद्राबाद संघाने ट्विट केला आहे.

सानिया मिर्झा हिचा व्हिडिओ:

 

आयपीएलच्या 12 व्या सीजनमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने 9 पैकी 7 सामने जिंकत 14 पाईंट्स मिळवले असून हा संघ स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. तर सनरायजर्स हैद्राबाद संघाने 8 पैकी 4 सामने जिंकले असून 8 पाईंट्ससह संघ स्पर्धेत पाचव्या स्थानी आहे.