IND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी विभाग खूपच मजबूत, भारतीय फलंदाजांना या चार खेळाडूंपासून राहावे लागणार सावधान
Rohit Sharma And Surya (Photo Credit - X)

IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) बार्बाडोस येथे होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत आज फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाचे कडवे आव्हान असणार आहे. टीम इंडियाला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंपासून सावध राहावे लागणार आहे. (हे देखील वाचा: IND vs SA T20 WC 2024 Final: रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का? भारतासाठी चिंतेचा विषय)

1. तबरेझ शम्सी (Tabrez Shamsi)

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी या विश्वचषकात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी विभाग खूपच मजबूत दिसत आहे. तबरेझ शम्सीने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध सेमीफायनलमध्ये शम्सीने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या सामन्यात तबरेझने 3 बळी घेतले. अशा स्थितीत भारतीय फलंदाजांना या गोलंदाजाबाबत थोडे सावध राहावे लागणार आहे.

2. कागिसो रबाडा (Kagiso Rabada)

कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. रबाडाला भारतीय संघाचे फलंदाज, त्यांची कमकुवतता आणि बलस्थाने चांगलीच ठाऊक आहेत. या विश्वचषकात रबाडाही अप्रतिम गोलंदाजी करत आहे. रबाडा आत्तापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 12 बळी घेतले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या फलंदाजांना रबाडापासून धोका होऊ शकतो.

3. एनरिक नॉर्टजे (Anrich Nortje)

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजे अप्रतिम कामगिरी करत आहे. एनरिक नॉर्टजे आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एनरिकने आपल्या वेगानं या स्पर्धेत विरोधी फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एनरिक नॉर्टजेने 8 सामन्यात 13 बळी घेतले आहेत.

4. मार्को जॅन्सन (Marco Johnson)

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनची कामगिरीही अप्रतिम राहिली आहे. विशेषतः मार्कोने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. हा डावखुरा गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांची खडतर परीक्षा देऊ शकतो. मार्को जॅनसेनने 8 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत.