South Africa Women National Cricket Team vs England Women National Cricket Team 2nd T20I 2024: दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे. पहिल्या T20 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 4 गडी राखून पराभव केला. यासह पाहुण्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-० अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ पुनरागमनाकडे डोळे लावून बसेल आणि मालिकेत बरोबरी साधू इच्छितो. दुसरीकडे इंग्लंडचा संघ दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. (हेही वाचा - KL Rahul Emotional Farewell: KL राहुलने LSG ला दिला भावनिक निरोप, संजीव गोयंका यांच्यावर काय म्हणाले घ्या जाणून)
दक्षिण आफ्रिका महिला आणि इंग्लंड महिलांनी आतापर्यंत 26 वेळा टी-20 सामना खेळला आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 26 पैकी 21 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने केवळ 4 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. यावरून इंग्लंड बलाढ्य असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला घरच्या मैदानावर विजयासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, फेय ट्यूनिकलिफ, ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नॉन्डुमिसो शांगासे, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा, आयंदा हलुबी
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): डॅनिएल व्याट-हॉज, माईया बौचियर, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकिपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन फाइलर