Photo Credit- X

South Africa Women's Team Win 1st Semi Final : महिला टी 20 विश्वचषक 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या (AUS vs SA)महिला संघाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी 20 विश्वचषकातील (2024 ICC Women’s T20 World Cup)गट सामन्यांमध्ये अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विक्रमी सहा वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुरूवातीपासूनच सामन्यात दबदबा राखत दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. (हेही वाचा: Pakistan vs England 2nd Test 2024 Day 4 Preview: चौथ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज गाजवणार मैदान की पाकिस्तानी गोलंदाज करणार कहर? मिनी बॅटल, खेळपट्टी, हवामान आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील जाणून घ्या)

लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्त्वाखालील महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर होती. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनेही महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला आठ सामन्यांमध्ये पराभूत केले. त्यांनी या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या सलग 15 सामन्यांच्या विजयी मालिकेचाही अंत केला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गतवर्षीच्या महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव केला होता. यंदा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला बाहेर करत दक्षिण आफ्रिकेने मोठा बदला घेतला आहे. 2023 मध्ये, केप टाऊनमधील न्यूलँड्स येथे झालेल्या फायनलमध्ये सन लुसचा दक्षिण आफ्रिका मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियाकडून 19 धावांनी पराभूत झाला होता.