South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 2nd Test 2025 Live Streaming: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. आता दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे पाकिस्तान संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी 3 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता न्यूलँड्स, केप टाउन येथे खेळवला जाईल. (हे देखील वाचा: SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?)
भारतात कुठे पाहणार लाइव्ह सामना?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 SD आणि स्पोर्ट्स 18-1 HD चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेता येईल.
दोन्ही संघांतील खेळाडू
दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.
पाकिस्तान: शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास