South Africa National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (SA vs PAK) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 03 जानेवारीपासून (शुक्रवार) न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 80 षटकांत 4 गडी गमावून 316 धावा केल्या. कर्णधार टेंबा बावुमा आणि रायन रिकेल्टन यांच्या दमदार खेळीने संघाला मजबूत स्थितीत आणले. बावुमाने 179 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 106 धावांचे शानदार शतक झळकावले.
पाकिस्तानला बॅकफूटवर
दुसरीकडे, रायन रिकेल्टन क्रीजवर राहिला आणि त्याने 232 चेंडूत 21 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 176 धावा केल्या. दोन्ही फलंदाजांमध्ये झालेल्या 235 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. मात्र, सलमान अली आगाने बावुमाला बाद करून ही भागीदारी तोडली आणि 18 षटकांत 55 धावांत 2 बळी घेतले. पुनरागमन करण्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी चांगली गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा सामना त्यांच्या हातातून जाऊ शकतो.
किती वाजता सुरु होणार सामना?
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 03 जानेवारी (शुक्रवार) पासून न्यूलँड्स, केपटाऊन येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 02:00 वाजता खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ 04 जानेवारी रोजी दुपारी 02.00 वाजता सुरू होईल.
कुठे पाहणार लाइव्ह सामना?
पाकिस्तानच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा अधिकृत प्रसारण भागीदार Viacom18 आहे. भारतातील चाहते Sports18 1 SD/HD टीव्ही चॅनेलवर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी 2025 चे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसेच भारतातील चाहते JioCinema ॲप आणि वेबसाइटवर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीचे लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहू शकतात.