बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना आज सकाळी छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर कोलकाता (Kolkata) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला यापुरवो हृदय संबंधित आजारामुळे यंदा महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि वैद्यकीय प्रक्रियेद्वारे उपचार घेण्यात आले होते. अलीकडेच, 48 वर्षीय माजी क्रिकेटपटू आणि माजी भारतीय कर्णधारावर छातीत दुखल्यानंतर कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी एक स्टेंट लावण्यात आला. बेंगलोर येथील नामांकित डॉक्टर डॉ. शेट्टी यांनी कोलकाता येथे येऊन गांगुलीवर उपचार केले होते ज्यानंतर काही दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, गांगुलीनंतर त्याचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीचीही कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. "मी ठीक आहे," सौरव गांगुली यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांगितले होते. (Sourav Ganguly Fortune Oil Ad: सौरव गांगूली यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचा Adani Wilmar यांना धक्का, फोर्च्यून तेल संदर्भातील जाहीराती हटवल्या)
दरम्यान, यापूर्वी 9 सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले ज्याने गांगुलीला त्याच्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील उर्वरित अडथळ्यांसाठी आणखी एंजिओप्लास्टीची गरज नसल्याचा ठरवलं होतं. कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये गांगुलीच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवल्यामुळे हे भारतीय संघातील अनेक चाहत्यांसाठी चिंताजनक आहे. गांगुलीला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही चिंताजनक बाब आहे. यापूर्वी गांगुली जेव्हा रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा त्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये त्यांना सौम्य ह्रदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं होत.
BCCI Chief Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after he complained of chest pain. More details awaited.
(File photo) pic.twitter.com/e72Iai7eVz
— ANI (@ANI) January 27, 2021
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या गांगुलीने 113 टेस्ट आणि 311 वनडे सामने खेळले. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे दोन दशकांहून अधिक काळानंतर कसोटी सामना जिंकला आहे. गांगुलीच्याच नेतृत्वात संघाने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली आहे. 2000 मध्ये चाहत्यांचा विश्वास ढासळलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कमबॅक केलं. 2003 आयसीसी क्रिकेट विश्वचषकच्या अंतिम सामन्यातही भारताने प्रवेश मिळविला परंतु जोहान्सबर्ग येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सौरवने गुलाबी बॉल टेस्टमधेही भारताने स्थान मिळवून द्यायला मोलाचे काम केले आहे.