Solidarity Cup: दक्षिण आफ्रिकेतील 3 संघांमध्ये एकाच दिवशी रंगणार क्रिकेटचा सामना, एबी डीव्हिलियर्स एका संघाचा कर्णधार; जाणून घ्या नियम
एबी डीव्हिलियर्स (Photo Credit: Getty Images)

करोना व्हायरसमुळे तब्बल अडीच महिना बंद असलेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौर्‍यावर असताना आता दक्षिण आफ्रिकेतही (South Africa) नव्या ढंगात क्रिकेट पुनरागमन करणार आहे. 27 जून रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणाऱ्या सॉलिडेरिटी कप (Solidarity Cup) स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या तीन संघांमध्ये एकाच दिवशी 36 ओव्हरचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील अनुभवी आणि मोठे खेळाडू सामील होणार आहेत. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीच्या खेळाडूंना खेळण्याची ही संधी आहे, परंतु धर्मादाय संस्थेसाठी निधीसुद्धा जमा करण्याचा यामागचा उद्देश्य असेल. तीनही सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील आणि सीएसएच्या प्रोटोकॉलसाठी घरगुती खेळासाठी परतण्याची कसोटी आहे. दरम्यान, या सामन्याचे नियमही वेगळे असणार आहेत. (IND Tour Of SA 2020: टीम इंडियाच्या ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत कोणतीही वचनबद्धता नाही, BCCI ने फेटाळला CSA चा दावा)

एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डी कॉक आणि कगिसो रबाडा यांना कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. निधी जमवण्यासाठी खेळण्यात येणाऱ्या सामन्यास Solidarity Cup असे नाव देण्यात आले आहे. एकूण 12 ओव्हरच्या प्रत्येक डावात सहा खेळाडू फलंदाजी करतील तर संघात एकूण 8 खेळाडू असतील. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल, पण त्याला केवळ दुहेरी धाव घेता येईल. एकेरी धाव मोजली जाणार नाही. सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक प्रदान करण्यात येईल. आणि सामना टाय झाल्यास सुपर-ओव्हरने सामन्याचा निर्णय होईल. पण तीनही संघांमध्ये टाय झाल्यास तिघांनाही सुवर्णपदक देण्यात येईल.

दरम्यान, सीएसएला कडक प्रोटोकॉल अंतर्गत सामन्यांचे आयोजन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. सीएसए क्रिकेटचे संचालक ग्रिम स्मिथ म्हणाले की, “मला माहित आहे की खेळाडू पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये येण्यासाठी आनंदित आहेत, म्हणूनच आम्ही सॉलिडॅरिटी कपबद्दल खूप उत्सुक आहोत.”