SL vs WI (Photo Credit - X)

Sri Lanka National Cricket Team vs West Indies Cricket Team 1st ODI:  श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (SL vs WI 1st ODI) आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे.  या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला असून, श्रीलंकेला प्रथम गोलंदाजी करावी लागली.  (हेही वाचा - Sri Lanka vs West Indies 1st ODI Pitch And Weather Report: पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोणाचे असेल वर्चस्व? सामन्यापूर्वी खेळपट्टीचा आणि हवामानाची स्थिती अहवाल घ्या जाणून )

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा खेळ पहायला मिळाला. पावसामुळे खेळ ज्यावेळी थांबला त्यावेळी वेस्ट इंडिजचा स्कोर 38.3 षटकांत 4 बाद  185 धावा झाल्या आहेत. आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजने सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतू श्रीलंकन गोलंदाजांनी त्यांना जास्त स्थिरावू दिले नाही. फिरकी गोलंदाज वानंदू हसिरंगेने या सामन्यात 2 विकेट घेतल्यात तर शेर्फेन रूदरफोर्ड आणि रोस्टन चेसने वेस्ट इंडिजसाठी पाचव्या विकेटसाठी चांगली भागिदारी केली. यामध्ये शेर्फेन रूदरफोर्डने 82 चेंडूत 74 धावा केल्या तर रोस्टन चेसने 33 चेंडूत 33 धावा केल्या. हे दोघे सध्या नाबाद असून पावसामुळे खेळ थांबला तेव्हा दोघेही चांगल्या लयीत खेळत होते.

नुकतीच दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळली गेली ज्यात श्रीलंकेने 2-1 ने विजय मिळवला. अशा स्थितीत यजमान संघाला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयाने सुरुवात करायची आहे आणि वेस्ट इंडिजचा पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची इच्छा आहे.