India A Cricket Team vs India B Cricket Team Duleep Trophy 2024 Scorecard: दुलीप ट्रॉफी 2024 च्या (Duleep Trophy 2024) पहिल्या सामन्यात, भारत ब संघाने चमकदार कामगिरी करत भारत अ संघाचा 76 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारत ब संघाचे कर्णधार अभिमन्यू इसवरन (Abhimanyu Eswaran) होते तर भारत अ संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) होते. बर्थडे बॉय गिल सामन्याच्या शेवटच्या दिवशी काही अप्रतिम करू शकला नाही त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. (हे देखील वाचा: Dhruv Jurel New Record: ध्रुव जुरेलने एमएस धोनीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विशेष क्लबमध्ये मिळवले स्थान)
𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐁 𝐖𝐢𝐧 🙌
Akash Deep's fighting knock of 43(42) comes to an end as he's run out by a quick-thinking Musheer Khan.
India B beat India A by 76 runs. A fantastic win 👏#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/f3XjnSMrVf
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 8, 2024
दुलीप करंडक स्पर्धेतील त्याच्या संघाचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात भारत ब संघाच्या विजयाचा हिरो ठरला 19 वर्षीय फलंदाज मुशीर खान, त्याने संघर्ष करत 181 धावांची खेळी केली आणि संघाला पहिल्या डावातच आघाडी मिळवून दिली.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून शुभमन गिलने इंडिया बला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुशीर खानच्या शतकाच्या जोरावर त्यांनी पहिल्या डावात 321 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत अ संघाला केवळ 231 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात भारत ब संघ काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 184 धावांवर सर्वबाद झाला. अशा स्थितीत भारत ब संघाला विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करताना त्यांना केवळ 198 धावा करता आल्या आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लागला.