Maratha Royals Beat Mumbai Falcons: श्रेयस अय्यरने 10 दिवसांत गमावला दुसरा अंतिम सामना, IPL 2025 नंतर पुन्हा एकदा तुटलं मन
श्रेयसला 10 दिवसांत दुसऱ्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जला आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा अय्यरचे मन दुखावले आहे.
T20 Mumbai League 2025 Final: टी-20 मुंबई 2025 चा अंतिम सामना मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात झाला. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या संघ मुंबई फाल्कन्सला 5 विकेट्सने दारुण पराभव स्वीकारावा लागला. श्रेयसला 10 दिवसांत दुसऱ्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी, श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जला आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा अय्यरचे मन दुखावले आहे. (हे देखील वाचा: धमाकेदार होणार 2026 ची सुरुवात, घरच्या मैदानावर 'या' बलाढ्य संघाविरुद्ध भिडणार Team India! कोहली-रोहितचंही दिसणार जलवा)
So close, yet again💔
Another T20 league final slips away from Shreyas Iyer.
📸: Jio Hotstar pic.twitter.com/gugVFBMAxR
— CricTracker (@Cricketracker) June 12, 2025
अय्यरच्या संघाचा 5 विकेट्सने झाला पराभव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अय्यरच्या संघ मुंबई फाल्कन्सने 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. मुंबई फाल्कन्सकडून फलंदाजी करताना मयुरेश तांडेलने 32 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 3 षटकार निघाले. याशिवाय हर्षने 28 चेंडूत 47 धावा केल्या, ज्यामध्ये 1 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर फलंदाजी करताना अय्यर 17 चेंडूत फक्त 12 धावा काढून बाद झाला. मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सकडून गोलंदाजी करताना वैभव माळीने 4 षटकांत 32 धावा देऊन सर्वाधिक 2 बळी घेतले.
19.2 षटकांत लक्ष्य गाठले
यानंतर, मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सने फलंदाजी करताना 19.2 षटकांत 5 विकेट गमावून लक्ष्य गाठले. मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सकडून फलंदाजी करताना चिन्मय राजेशने 49 चेंडूंत सर्वाधिक 53 धावा केल्या. ज्यामध्ये 2 चौकार आणि 2षटकारांचा समावेश होता. ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. याशिवाय आवेश खानने 24 चेंडूंत 38 धावा केल्या, साहिलने 12 चेंडूंत 22 धावा केल्या. मुंबई फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना कार्तिक मिश्रा आणि यशने प्रत्येकी 2 बळी घेतले.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 08:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

