Shreyas Iyer New Captain of Punjab Kings: पंजाब किंग्ज संघ (Punjab Kings) 2008 पासून आयपीएलमध्ये (IPL) सहभागी होत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. पण यावेळी पंजाब किंग्जने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर तो पंजाबचा कर्णधार होणार हे स्पष्ट झाले. सलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस-18 सीझनमध्ये श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग पाहुणे म्हणून आले होते. जिथे सलमान खानने पुष्टी केली की अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असेल. यानंतर, पंजाब संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले.
𝘞𝘪𝘵𝘩 𝘨𝘳𝘦𝘢𝘵 𝘱𝘰𝘸𝘦𝘳 𝘤𝘰𝘮𝘦𝘴 𝘨𝘳𝘦𝘢𝘵 𝘳𝘦𝘴𝘱𝘰𝘯𝘴𝘪𝘣𝘪𝘭𝘪𝘵𝘺! 💫#CaptainShreyas #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/jCYtx4bbVH
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
पंजाबने पॉन्टिंगकडे सोपवली मोठी जबाबदारी
श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्यासोबतच पंजाब किंग्जने रिकी पॉन्टिंगवर मोठी जबाबदारीही सोपवली आहे. संघाने पॉन्टिंगला मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. पॉन्टिंग डिसेंबर 2024 मध्ये पंजाब किंग्जमध्ये सामील झाला. तो यापूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये होता. पॉन्टिंगने अय्यरबद्दल सांगितले की, श्रेयसला खेळाबद्दल चांगली कल्पना आहे. त्याने त्याची कर्णधारपदा सिद्ध केली आहे. मी आयपीएलमध्ये अय्यरसोबत चांगला वेळ घालवला आहे.
आयपीएल 2025 साठी पंजाब संघ:
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस (2.60 कोटी रुपये), लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे.