
Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. हा महत्वाचा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या इंग्लंड संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाला हा विजय मिळवून मालिकेत विजयाची नोंद करायची आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 6 गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. बेन डकेटने दुसऱ्या दिवशी इंग्लंडकडून शतक झळकावले. सध्या, इंग्लंडसाठी, जेमी स्मिथ 33 चेंडूत नाबाद 12 धावा आणि ब्रेडेन कार्स 19 चेंडूत 2 धावा करून नाबाद आहेत.
पाकिस्तानचा पहिला डाव 366 धावांवर आटोपला
दुसरीकडे, पाकिस्तानकडून साजिद खानने 19 षटकांत 86 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले. तर नोमान अलीने 2 बळी घेतले. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव 123.3 षटकांत 366 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॅक लीचने सर्वाधिक 4 बळी घेतले. (हे देखील वाचा: Pakistan vs England 1st Test 2024 Day 2 Scorecard: पाकिस्तानचा डाव 366 धावांवर संपला, कामरान गुलामचे शतक; जॅक लीचने घेतले 4 विकेट)
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की, सामन्याला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण होणार नाही. तथापि, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद घेता येईल.
दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.
पाकिस्तान : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.