कोविड-19 लॉकडाउन (Lockdown) दरम्यान वेगळे ठेवणे बर्याच लोकांसाठी कठीण काम असू शकते. तथापि, भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आपल्या कुटूंबियां समवेत नक्कीच खूप आनंदात आहे आणि वस्तुस्थिती तपासण्यासाठी त्याच्या सोशल मीडियावर जाऊन बघू शकतात. लॉकडाउनमध्ये ‘गब्बर’ने बर्याचदा आपल्या चाहत्यांसह दररोजच्या जीवनातील मजेदार व्हिडिओज शेअर करत असतो आणि यूजर्सना ते खूप पसंती पडतात. त्याने नुकतच त्याचा मुलगा जोरावर (Zoravar) 1996 मधील ‘चाहत’ या चित्रपटाच्या ‘डॅडी कूल’ गाण्यावर डान्स करताना दिसून आले. दोघांनी एक अद्वितीय पोशाख घातला आहे आणि त्यांच्या या डान्सने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. भारतात लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढल्यानंतर आयपीएल 2020 देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. (Lockdown: शिखर धवन-श्रेयस अय्यरमध्ये रंगला Rapid Fire चा खेळ; मनोरंजक गोष्टींचा केला खुलासा, जाणून घ्या)
“या मस्तीखोर मुलाबरोबर आयुष्य खूप मजेदार आहे! खरं बोलू, दोन्ही पिता आणि मुलगा मस्त आहेत! या लहान मुलावर खूप प्रेम!," धवनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले. पाहा हा व्हिडिओ:
कपडे धुण्यापासून वर्कआउटपर्यंत आणि पत्नी आणि मुलांसमवेत मौजमजा करण्यापर्यंत शिखरने स्वतःला विविध कामांमध्ये व्यस्त ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी शिखरने पत्नी आयशा मुखर्जी सोबत 'ढल गया दिन हो गया शाम' वर रेट्रो स्टाईलमध्ये डान्स केला होता आणि आता धवनने मुलगा जोरावरसोबत शाहरुख खानच्या गाण्यावर डान्स केला. धवनला संगीताची खूप आवड आहे आणि तो सध्या बासुरी वाजवायला शिकत आहे. नुकतेच एका इन्स्टाग्राम लाईव्ह सत्रादरम्यान तो म्हणाला, "वाद्य वाजवताना आपल्या शरीरातील स्पंदने आपल्याला जाणवतात. संगीत आपल्याला शांती देते. आपणास कोणतेतरी वाद्य वाजवायला शिकले पाहिजे. कारण आता तुम्हाला घरी बराच वेळ घालवावा लागत आहे."