शाहरुख खान (Photo Credits-Twitter)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आणि कॅरिबियन प्रीमियर लीगनंतर (Caribbean Premier League) बॉलीवूडचा 'बादशाह' शाहरुख खान (Shah Rukh Khan) आता अमेरिकेत आयपीएलच्या (IPL) पार्श्वभूमीवर होणाऱ्या टी-20 लीगमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाला आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार शाहरुखने लॉस एंजलिस (Los Angeles) संघ खरेदी केला असून आपल्या संघाचं नाव त्याने LA Knight Riders असं ठेवलं आहे. यापूर्वी शाहरुखने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सीपीएलमधील त्रिंबागो नाईट रायडर्स (Trinabago Knight Riders) संघाचा मालक आहे. अमेरिकेत येत्या काळात टी-20 स्पर्धा आयोजित केली जाणार असून स्पर्धेत न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को, वॉशिंग्टन डी.सी, शिकागो, डल्लास आणि लॉस एंजलिस असे सहा संघ सहभागी होतील. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात क्रिकेटवर भारताइतकेच प्रेम केले जाते. जेव्हा शाहरुखसारखा सुपरस्टार अमेरिकेत क्रिकेट फ्रँचायझी खरेदी करतो, तेव्हा देशातील क्रिकेट चाहत्यांचा आवाज अमेरिकेपर्यंत गूंजेल.

दरम्यान, American Cricket Enterprise ही कंपनी अमेरिकेत टी-20 क्रिकेटचं आयोजन करणार असून शाहरुखच्या फर्मची यामध्ये भागीदारी आहे. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी शाहरुखने ‘Indian exclusivity’ अंतर्गत लॉस एंजलिस संघाची मालकी घेतली आहे म्हणजेच इतर कोणाताही भारतीय संघ कमीत अमी 5 वर्षासाठी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या समारोपानंतर 2022 मध्ये ही स्पर्धा सुरु होईल. इतकंच नाही तर या स्पर्धेत अमेरिकेच्या शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियम उभारण्यात शाहरुखची कंपनी आपले योगदान देईल असेही अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, शाहरुखच्या नाईट रायडर्सचे जगभरात 3.5 अब्ज चाहते असल्याचे म्हटले जाते. नाईट रायडर्स समूहाच्या इतर भागधारकांमध्ये जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांचा समावेश आहे. जय मेहता, आंतरराष्ट्रीय मेहता ग्रुपचा मालक असलेल्या कुटुंबाचे सदस्य आहेत. टी-20 क्रिकेट 2003 मध्ये युनायटेड किंगडममध्ये विकसित केले गेले होते आणि भारत, इंग्लंड, कॅरिबियन आणि इतरत्र प्रो-लीग चालना देण्यापासून लोकप्रियतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.