डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (Photo Credit: Twitter)

आज, 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर शिक्षक दिवस साजरा केला जातो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्मदिवस. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (Teacher's Day) म्हणून साजरा केला जातो. ते एक उत्तम शिक्षक होते. 1909 ते 1948 असा 40 वर्ष त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात (Education Sector) आदर्श शिक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. शिक्षकांचा सन्मान आदर आणि गौरव करणारा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. 1962 साली डॉ. सर्वपल्ली राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन साजरा होतो. या खास दिवशी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो. आज त्यांच्या 132 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत राधाकृष्णन आणि भारतीय क्रिकेट संघातील एका खास कनेक्शनबद्दल. (Teachers' Day 2020 Greetings Cards: शिक्षक दिनी लाडक्या शिक्षकांना सरप्राईज देण्यासाठी अशा पद्धतीने घरच्या घरी बनवा ग्रिटिंग कार्ड्स!)

होय, भारताचे पहिले उपराष्ट्रपती यांचा भारतीय क्रिकेटशी एक जवळचे नातं आहे. आणि ते भारताचे फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांच्या रूपात. लक्ष्मण तुम्हाला 'वेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण' या नावाने माहित असतील, पण आजही अनेकांना हे माहित नसेल की लक्ष्मण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पुतणे आहेत. ही माहिती फारच थोड्या लोकांना आहे. ही माहिती लक्ष्मणच्या विकिपीडिया पेजवर देखील देण्यात आली आहे. लक्ष्मणबद्दल आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे 16 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळूनही त्यांना कधीही भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नाही, होय, लक्ष्मणने कारकिर्दीत एकही वर्ल्ड कप सामना खेळला नाही.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवली असली तरी शेवटपर्यंत त्यांनी आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली, म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबरचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सर्वपल्ली यांना 16 वेळा नोबेल साहित्य पुरस्कारासाठी तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी 11 वेळा नामांकन मिळाले होते. 17 एप्रिल 1975 रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.