T20 World Cup 2021: युएई (UAE) येथे टी-20 वर्ल्ड कपची (T20 World Cup) उलटी गती सुरू झाली असून जगभरातील संघ आपल्या संघांना शोपीस कार्यक्रमासाठी अंतिम स्वरूप देण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतीय संघाबद्दल (Indian Team) बोलताना माजी फलंदाज आणि भाष्यकार संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांना वाटते की सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा तिसऱ्या स्थानासाठी एक आदर्श पर्याय ठरू शकतो, खासकरुन तेव्हा जेव्हा रोहित शर्मासह (Rohit Sharma) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सलामीला येईल. टी -20 विश्वचषक 2021 ची स्पर्धा भारतात होणार होती, परंतु देशातील कोविड-19 मुळे ते ओमान व युएईमध्ये हलवण्यात आले. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धा खेळली जाणार आहे. (T20 World Cup 2021: रोहित शर्माचा सलामी साथीदार कोण असणार, माजी भारतीय दिग्गजाने विराट कोहलीच्या वर ‘या’ खेळाडूवर लावला दाव)
रोहित आणि विराटच्या जोडीने यंदा मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पाचव्या सामन्यात सलामीला उतरली व 94 धावांची भागीदारी केली. “मला वाटते की तो (सूर्य) आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे, खासकरुन तेव्हा जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे सलामीला उतरणार आहेत. माझ्यासाठी तीन नंबरचा स्लॉट खुला असू शकतो,” मांजरेकरने व्हर्च्युअल संवादादरम्यान म्हटले. “राहुल (केएल) बरोबर त्यांची योजना काय आहे हे मला माहिती नाही, सूर्यकुमार यादव सारख्या व्यक्तीसाठी नक्कीच जागा आहे. आयपीएलमध्ये संपूर्ण हंगामात अशा प्रकारचे फलंदाज मी कदाचितच पाहिले आहेत. ते त्याला तिसऱ्या स्थानासाठी आदर्श बनवते. तो चौकारांकरिता चांगला चेंडू ठोकू शकतो, हा निश्चितच एक पर्याय आहे,” त्याने पुढे म्हटले. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेबद्दल बोलता मांजरेकर म्हणाले की ते संजू सॅमसनऐवजी अधिक सुसंगत ईशान किशनला प्राधान्य देतील. मांजरेकर म्हणाले की, कसोटी क्रिकेटमध्ये विकेटमागील कौशल्य अधिक महत्त्व असते, म्हणूनच व्हाइट बॉल स्वरूपात दर्जेदार फलंदाज असणे हा एक उत्तम पर्याय आहे.
तसेच माजी फलंदाजाच्या म्हणण्यानुसार, फिरकीपटू कुलदीप यादव याच्यासाठीही श्रीलंका दौरा महत्त्वाचा असंणार आहे. "निवड ज्या पद्धतीने झाली त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे. कुलदीप यादवला परत आणलेले पाहून आनंद झाला आहे शेवटच्या वर्षात किंवा दोन वर्षांत त्याने जागा गमावली. निवडकर्त्यांनी त्याला आपला हक्क सांगण्याची संधी दिली हे छान आहे, कारण तो आयपीएलसाठी फारसा खेळत नाही.त्याच्याकडे संधी आहे आणि त्या टी-20 विश्वचषकात त्या स्थानासाठी त्याला स्पर्धा करावी लागेल. त्याला सिद्ध करणे आवश्यक आहे की तो एक चांगला पर्याय आहे,” मांजरेकर पुढे म्हणाले.