IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज प्ले-ऑफमधून बाहेर पडल्यानंतर साक्षी धोनी झाली भावूक; पती महेंद्र सिंह धोनी याच्यासाठी ट्विटरवर केली 'अशी' पोस्ट
Sakshi Dhoni (Photo Credits: Twitter)

आयपीएलच्या (IPL 2020) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ यावर्षी पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. या लीगमध्ये चेन्नईच्या संघाने अकराव्यांदा भाग घेतला आहे. दरम्यान, महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईच्या संघाने 10 हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. परंतु, यावर्षी चेन्नईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनेदेखील (Sakshi Dhoni) सोशल मिडियावर एक भावनिक पोस्ट लिहून चेन्नईच्या संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच साक्षी धोनीने ट्विटरवर एक कविता पोस्ट केली आहे. ज्यात लिहले आहे की, हा एक खेळ आहे. हरणे कोणालाही आवडत नाही, पण प्रत्येकाला जिंकताही येत नाही. काहीजण विजयी होतात तर, काही पराभूत. एकिकडे आनंद साजरा केला जातो तर, दुसरीकडे दुख. गेल्या अनेक वर्षात तू मोठ्या विजयांसह पराभवांनादेखील सामोरे गेला आहेस. यामुळे या पराभवाने खचून जाऊ नको. तू तेव्हाही विजेता होतास आणि आजही विजेता आहेस. खरा युद्धा लढण्यासाठीच जन्माला येतो. त्यांच्यासाठी नेहमीच आपल्या मनात आणि हृदयात सुपरकिंग्जचे स्थान असेल. हे देखील वाचा- Sunil Gavaskar On KL Rahul: किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल याचे सुनील गावस्कर यांनी केले कौतूक

 रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव केला होता. या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने मिळवलेला हा चौथा विजय होता. तथापि, संघ 8 गुणांसह टेबलमध्ये सर्वात कमी आठव्या स्थानावर आहे. पण राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चेन्नईच्या संघाला स्पर्धेबाहेर केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तब्बल आठ हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या 3 किताबावर आपले नाव कोरले आहे.