Sachin Tendulkar and Sourav Ganguly (File Photo)

पुलवामा दह्शतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack) देशभरात संतापाचं वातावरण आहे. सामान्यांपासून कलाकार आणि क्रिडा क्षेत्रामध्ये याचे पडसाद उमटले आहेत. आगामी इंग्लंड येथे होणार्‍या वर्ल्डकपमध्ये (ICC World Cup 2019)  पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यावरून अनेक दिग्गज खेळाडूंमध्ये मतमतांतर आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) , सुनिल गावस्कर यांच्यामते पाकिस्तानी संघाला मैदानात नमवावे तर सौरव गांगुलीच्या मते पाक संघावर बहिष्कार घालावा. सध्या हा वाद ट्विटरपर्यंत पोहचला आहे. सोशल मीडियामध्ये लोकं सोयीस्करपणे अर्थ लावत असल्याने काही समज-गैरसमज पसरले आहेत. या सार्‍यांचा खुलासा करण्यासाठी सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) खास मेसेज लिहला आहे.

गांगुलीने ट्विटरवर लिहलेल्या प्रतिक्रियेनुसार तो म्हणाला, "मी आणि सचिन तेंडुलकर मागील 25 वर्षांपासून चांगले मित्र आहोत. सचिनच्या मताला विरोध करण्याची माझी इच्छा नाही, मलादेखील विश्वकप हवा आहे." या ट्विटवर उत्तर देताना सचिन तेंडुलकर म्हणाला." तुला अशाप्रकारे 'सफाई' देण्याची काहीच गरज नाही. आपल्याला देशासाठी जे सर्वोत्तम असेल तेच व्हावे अशी आशा आहे."

सचिन तेंडुलकरने भारत विरूद्ध पाकिस्तान सामना आणि विश्वचषक यामध्ये खेळताना वॉक ओव्हर स्थितीमध्ये पाकिस्तानला 2 गुण देऊन टाकणे हे चूकीच असल्याचं म्हटलं आहे. आपण विश्वचषकामध्ये प्रत्येक वेळेस पाकिस्तानवर मात केली आहे. देशासाठी जे हितावह असेल त्या निर्णयाचा मी आदर करतो असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं.