Ajinkya Rahane-Virat Kohli Captaincy Debate: वर्ष 2020 टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) काही खास ठरले नाही. मागील वर्षात विराटला तीनही स्वरूपात एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही. टीम इंडियाला (Team India) त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडमधील कसोटी मालिका गमवावी लागली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) अॅडिलेड येथे खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीमला आठ विकेट्सचा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यानंतर विराट पॅटर्निटी रजेवर परतला आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात टीम इंडियाने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) जबरदस्त पुनरागमन केले आणि सामना आठ विकेट्सने जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराटच्या कर्णधारपदाची तुलना रोहित शर्मा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये रहाणेशी केली जाते. रहाणे आणि विराटच्या कसोटी क्रिकेटमधील कर्णधारपदाच्या तुलनेवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आपले मत व्यक्त केलं आहे. (IND vs AUS 2nd Test 2020: अजिंक्य रहाणेचे ऑस्ट्रेलियात डंका, MCG मध्ये सचिन तेंडुलकर 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय कर्णधार)
विराट-अजिंक्यच्या कर्णधारपदाच्या तुलनेवर पीटीआयच्या मुलाखतीत सचिन म्हणाला की, “लोकांनी विराटच्या तुलनेत घुसू नये. अजिंक्य यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. त्याचा हेतू आक्रमक होता. मला सर्वांना आठवण करून द्यायला आवडेल की ते दोघेही भारतीय आहेत आणि ते दोघेही भारताकडून खेळतात, त्यामुळे कोणतीही व्यक्ती भारताच्या वर नाही. संघ आणि देश या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत.” ऑस्ट्रेलियामध्ये भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली होती आणि त्यानंतर टी-20 मालिकेत जबरदस्त कमबॅक करत मालिका 2-1 अशी जिंकली होती.
कोहली अॅडिलेड टेस्टनंतर पॅटरनिटी रजेवर मायदेशी परतला आहे. चार सामन्यांची टेस्ट मालिका सध्या 1-1 ने बरोबरीवर आहे. मालिकेचा तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, रोहित शर्मा संघात सामील झाला आहे तर उमेश यादवने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. रोहितच्या कमबॅकने टीम इंडियाची फलंदाजी मजबूत होईल, तर उमेशयादव च्या जागी शार्दूल ठाकूर की टी नटराजन यांच्यापैकी कोणाचा समावेश करावा याची डोकेदुखी संघापुढे आहे.