Sachin Tendulkar (Photo Credit - X)

Sachin Tendulkar Debut:  15 नोव्हेंबर हा दिवस सचिन तेंडुलकर आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे. 1989 मध्ये या दिवशी त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या कसोटी सामन्यात सचिनला फक्त एकदाच फलंदाजी करता आली, जिथे त्याने 15 धावा केल्या.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले तीन सामने अनिर्णित राहिले. 9 डिसेंबरपासून सियालकोटमध्ये शेवटचा संघर्ष सुरू झाला. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानच्या घातक गोलंदाजांचा सामना करणे हे सचिनसाठी खूप कठीण आव्हान होते. त्या काळात आणि वकार युनूस यांचा पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणात समावेश असायचा. खरे तर मालिकेतील चौथ्या सामन्यादरम्यान वकार युनूसचा एक बाउन्सर चेंडू सचिन तेंडुलकरच्या नाकावर आदळला. (हेही वाचा  -  Virat Kohli Fans: पर्थमध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहते झाडावर चढले, व्हिडिओ व्हायरल)

जखमी होऊनही पॅव्हेलियनमध्ये परतला नाही

हे सियालकोट कसोटीच्या शेवटच्या डावाबद्दल आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेतली होती आणि जेव्हा भारत दुसऱ्यांदा फलंदाजीला आला तेव्हा टीमने 38 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. 16 वर्षीय सचिन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघ अडचणीत आला होता. सचिन चांगली फलंदाजी करत होता, मात्र वकार युनूसचा चेंडू त्याच्या नाकावर आदळताच सचिनच्या नाकातून रक्त येऊ लागले.

त्या घटनेनंतर अनेक वर्षांनी सचिनने खुलासा केला होता की, तो वैद्यकीय तपासणीसाठी पॅव्हेलियनमध्ये परतला असता तर सामन्यावर पाकिस्तानचे वर्चस्व राहिले असते. त्यावेळी जावेद मियांदादने त्याला ‘तुझे नाक तुटले आहे, तुला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल’ असे सांगितले. सचिनने सांगितले की, पाकिस्तान संघाला सामना संपवायचा होता, त्यामुळे जावेद मियांदाद त्याला चिडवण्याचा आणि त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. सचिनने त्या डावात 134 चेंडू खेळून 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.