Sachin Tendulkar 100th Hundred: आजच्या दिवशी 2012 मध्ये ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 100वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याची अकल्पनीय कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. ढाका (Dhaka) येथे बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) झालेल्या आशिया चषक स्पर्धेत मास्टर ब्लास्टरने रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शतकांची शंभरीचा टप्पा गाठणारा पहिला व आतापर्यंतचा एकमेव फलंदाज ठरला. 16 मार्च 2012 रोजी सचिनने ढाका येथे बांग्लादेशविरुद्ध एशिया कप सामन्यात 145 चेंडूत 114 धावांची जोरदार खेळी केली. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील या जबरदस्त कामगिरीच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त सचिनने मंगळवारी युवराज सिंह, प्रग्यान ओझा (Pragyan Ojha), इरफान पठाण आणि अन्य इंडिया लेजेंड्सच्या (India Legends) साथीदारांसह आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा हा खास दिवस साजरा केला.
मास्टर-ब्लास्टर सचिनच्या कारकिर्दीतील हा खास दिवस साजरा करण्यासाठी सचिनने केक कापल्याचा व्हिडिओ ओझंने सोशल मीडियावर शेअर केला. तेंडुलकर सध्या रायपुर येथे सध्या सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये तो इंडिया लेजेंड्स संघाचे नेतृत्व करीत आहे. आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्या सचिनने दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्याच्या गौरवशाली आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. मास्टर ब्लास्टरने 1989 मध्ये 16व्या वर्षी भारतीय संघात प्रवेश केला होता काही वेळात जगभरातील फलंदाजांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले.
Different day but the reason remains the same. Celebrating @sachin_rt paaji’s 100th 100. pic.twitter.com/gKvubhsBHI
— Pragyan Ojha (@pragyanojha) March 16, 2021