RR vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय; रॉयल्सविरुद्धही रोहित शर्माला विश्रांती
राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

RR vs MI, IPL 2020: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील इंडियन प्रीमिअर लीगचा 45वा थोड्याच वेळात अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली असल्याने पुन्हा एकदा कीरोन पोलार्ड एमआयचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टँड इन कर्णधार कीरोन पोलार्डने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते प्ले ऑफ गाठणारी पहिली टीम बनेल तर रॉयल्ससाठी प्ले ऑफ शर्यतीत बनून राहण्यासाठी विजय मिळवणे गरजेचे आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला  आहे तर रॉयल्सने एकही बदल केलेला नाही.

मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये नॅथन कोल्टर-नाईलच्या जागी जेम्स पॅटिन्सनला पुन्हा संधी दिली आहे, तर रोहितच्या अनुपस्थितीत एमआयने प्लेइंग इलेव्हनमध्ये सौरभ तिवारीचा समावेश केला आहे. या शिवाय मुंबईच्या अंतिम-11च्या विजयी संयोजनात कोणताही बदल झाला नाही. आयपीएल 2020 मध्ये दोन्ही संघातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने याच मैदानावर राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत राजस्थानला केवळ मुंबईकडून सूड घेण्याची संधीच नाही तर प्ले ऑफ शर्यतीतही कायम राहण्याचा प्रयत्न करतील.

पाहा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: रॉबिन उथप्पा, बेन स्टोक्स, सजू सॅमसन, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि कार्तिक त्यागी

मुंबई इंडियन्स: कीरोन पोलार्ड (कॅप्टन), सौरभ तिवारी, ईशान किशन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, आणि राहुल चाहर.