राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Image)

RR vs KXIP, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रात आज राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी (Kings XI Punjab) होईल. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आपल्या मोहीमेची विजयी सुरू केली असताना पंजाबला त्यांच्या पहिल्या सामन्यात सुपर ओव्हर खेळली, जिथे त्यांचा पराभव झाला. मात्र, पंजाबने आपल्या दुसर्‍या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव केला. आता आपले विजयी अभियान सुरू ठेवण्यासाठी राजस्थान आणि पंजाब दोन्ही टीमचे लक्ष लागून असेल. आयपीएलच्या (IPL) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: हैदराबादचा पराभव करत KKRने उघडलं खातं, जाणून घ्या पॉईंट्स टेबलची स्थिती)

राजस्थानकडून संजू सॅमसन आपली लय कायम ठेवू इच्छित असेल, तर जोस बटलरच्या उपस्थितीमुळे राजस्थान रॉयल्स संघाला अधिक बळ मिळेल. राजस्थानकडून सॅमसन, स्टिव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे, किंग्स इलेव्हनने चालू हंगामात पराभवाने सुरुवात केली, मात्र दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करून विराट कोहलीच्या बेंगलोरचा 97 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात कर्णधार केएल राहुलने नाबाद 132 धावांचा डाव खेळला. अशा परिस्थितीत दोन्ही संघ सध्या विजयी रथावर स्वार आहेत.

किंग्स इलेव्हन पंजाब टीम: केएल राहुल (कॅप्टन), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस गेल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, हार्डस विल्जॉईन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, के गौतम, जे सुचीथ, ग्लेन मॅक्सवेल, शेल्टन कॉटरेल, दीपक हुड्डा, ईशान पोरेल, रवि बिश्नोई, जेम्स नीशाम, क्रिस जॉर्डन, तेजिंदर ढिल्लन आणि प्रभसिमरन सिंह.

राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, अँड्र्यू टाय, डेविड मिलर, टॉम कुरन, अनिरुद्ध जोशी , श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरर आणि मयंक मार्कंडे.