
RR vs GT IPL 2025 47th Match: आयपीएल 2025चा 47 वा (IPL 2025) सामना 28 एप्रिल रोजी म्हणजेच, राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) यांच्यात जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना राजस्थानसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. जर त्यांचा संघ आज हरला तर ते अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनू शकतो. दुसरीकडे, गुजरात हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-1 चा मुकुट परत मिळवून प्लेऑफकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनात, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, युधवीर सिंग चरक
🚨 𝑻𝑶𝑺𝑺 𝑼𝑷𝑫𝑨𝑻𝑬 🚨
RR skipper Riyan Parag has won the toss and elected to bowl first against GT! 👊#RRvGT #IPL2025 #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/ZUE21DCWGb
— Sportskeeda (@Sportskeeda) April 28, 2025