RCB (Photo Credit - X)

RCB vs GT head-to-head record in IPL: आयपीएलच्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात लढत होत आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) गुजरात टायटन्ससोबत होत आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी विविध संघांसोबत प्रत्येकी 2 मसामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन्ही सामन्यात त्यांना विजय मिळवला आहे. याशिवाय, ते पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहेत. RCB vs GT IPL 2025 Live Streaming: गुजरात टायटन्ससमोर मजबूत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे आव्हान; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?

आयपीएलमध्ये एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा परफॉर्मन्स

खेळलेले सामने: 91

सामने जिंकले: 43

सामने पराभूत: 43

दुसरीकडे, गुजरात टायटन्सनेही आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एका सामन्यात विजय आणि दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, आज ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जिंकण्याच्या इराद्याने ते एम. चिन्नास्वामी मैदानात उतरतील. शुभमन गिल गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर रजत पाटीदारच्या खांद्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नेतृत्वाची जबाबदारी असेल. दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.