
Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याची खेळपट्टीवरील उपस्थिती भारतासाठी खूप प्रभावी ठरू शकते असे मत सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केले आहे. 'रोहितने वेगवान सुरुवात करण्याचा दृष्टिकोन अवलंबला आहे. पण, या प्रयत्नांत तो अनेकदा लवकर बाद झाला आहे. त्याने वेगवान पवित्रा घेण्यात चूक काहीच नाही. पण, संघाचे हित लक्षात घेता त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ टिकणे महत्त्वाचे आहे,' असे गावस्कर यांनी म्हटले आहे. Gujarat Giants Women Beat Delhi Capitals Women: रोमहर्षक सामन्यात गुजरातने दिल्लीचा केला पराभव, हरलीन देओलची 70 धावांची शानदार खेळी
रोहितने 25 षटके फलंदाजी केली, तर भारताची धावसंख्या 180 ते 200 च्या घरात येईल. तेव्हा जर दोनच गडी बाद झाले असतील तर, अशा वेळी भारत 350 च्या आसपास मजल निश्चित मारू शकेल, असे गावस्कर यांनी नमूद केले. ‘‘वेगवान फलंदाजी करणे हा एक भाग झाला. पण, त्याने अशा वेळी स्वत:ला अधिक काळ खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. रोहित जेव्हा असा संयम बाळगतो, तेव्हा सामना पुढच्या संघाच्या हातून गेलेला असतो,’’ असे गावस्कर यांचे म्हटले आहे.
न्यूझीलंडकडे जिंकण्याची क्षमता
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारतविरुद्ध न्यूझीलंड सामना रोमांचकारी होईल असे मत व्यक्त करताना न्यूझीलंडकडे जिंकण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंड संघ हार मानणारा नाही. त्यांच्याकडे दमदार क्रिकेटपटू आहेत. दबावाखाली ते न डगमगता खेळतात, असेही हुसेन यांनी म्हटले आहे.