MS Dhoni ने या खेळाडूंवर विश्वास दाखवला, आज आपल्या जबरा कामगिरीने गाजवत आहे आंतरराष्ट्रीय मैदान
एमएस धोनी-रोहित शर्मा (Photo Credit: Getty)

सौरव गांगुली आणि एमएस धोनी (MS Dhoni) या दोन कर्णधारांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला असल्याचे मानले जाते आणि राष्ट्रीय संघात युवा खेळाडूंची भरभराट केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी सातत्याने कामगिरी बजावायची असल्यास त्याला कर्णधाराची साथ, त्याचा विश्वास मिळणेच गरजेचे असते. धोनीला जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. कर्णधार म्हणून त्याने जे काही त्याने प्रत्येकाचे मन जिंकले आहे. तथापि, एखादी मजबूत टीम धोनीच्या मागे नसती तर तो हे सर्व साध्य करू शकला नसता. आज आपण 3 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना धोनीने सातत्याने पाठिंबा दर्शवला आणि धोनीच्या निवृत्तीनंतरही ते आज आंतरराष्ट्रीय मैदान गाजवत आहे. (ICC WTC Final: टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये धुमाकूळ घातलेल्या ‘या’ भारतीय फलंदाजाने इंग्लंडमध्ये खेळला आहे फक्त एकच सामना, Team India साठी ठरणार फायदेशीर?)

रोहित शर्मा (Rohit Sharma)

अंडर-19 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माला 2007 च्या सुरुवातीला भारतीय संघाचे (Indian Team) प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंत तो संघासाठी नियमित कामगिरी कधीच करू शकला नाही. तोपर्यंत रोहित शर्माने मधल्या फळीत फलंदाजी केली. पण त्याला धोनीचा पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याला सलामीला येण्याची संधी मिळाली. त्यानंतर रोहितने मागे वळून कधीच पाहिले नाही. समकालीन काळात तो भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. तसेच त्याने बरीच महत्त्वाच्या मालिकांमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माने आशिया चषक 2018 जिंकला आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान मिळवले. पण 2013 पर्यंत त्याची कामगिरी अत्यंत उच्च दर्जाची नव्हती. त्या काळात जडेजाला धोनीने जबरदस्त पाठिंबा दर्शवला होता आणि याचा निकाल आता स्पष्ट दिसुन येत आहे. त्यानंतर, जडेजा तिन्ही स्वरूपात धोनीने संघात सामील केले. 2017 मध्ये जडेजाला भारतीय संघातून हाकलून देण्यात आले असले तरी अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून तो आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील घातक अष्टपैलू बनला आहे.

शिखर धवन (Shikhar Dhawan)

शिखर धवनवर कोणीही विश्वास दाखवला नव्हता तेव्हा महेंद्र सिंह धोनीने त्याला संधी देण्याचे ठरवले. धवनला वाईट काळात धोनीने सतत पाठिंबा दर्शवला आणि आता धवन एक खेळाडू म्हणून विकसित झाला आहे. जेव्हा धवनने आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली तेव्हा लवकरच तिन्ही फॉर्मेटमध्ये तो भारतीय संघाचा भाग झाला. तथापि, कसोटी क्रिकेटमधील त्याच्या भूमिकेबरोबर तो न्याय करू शकला नाही. त्यानंतरही मर्यादित षटकांच्या स्वरूपात धवनची मोठ्या प्रमाणात पाठराखण झाली. त्यानंतर धवनने 2018 पर्यंत भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळला. मर्यादित ओव्हरच्या स्वरूपात तो अजूनही भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे.