Rohit Sharma Most Test Sixes in a Calender Year: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील आज शेवटचा दिवस आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचे तीन दिवस पावसामुळे वाय गेले. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात तुफानी फलंदाजी करताना, रोहित शर्माने (Rohit Sharma) 2022, 2023, 2024 अशी सलग तीन वर्षे भारतीय कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.
एका कॅलेंडर वर्षात भारतीय कर्णधाराने मारलेले सर्वाधिक षटकार:
2023 मध्ये रोहितने 80 षटकार मारले होते
2022 मध्ये रोहितने 45 षटकार मारले होते
2024 मध्ये रोहितने 41* षटकार मारले
Most sixes by an Indian Captain in a Calendar Year:
80 sixes by Rohit in 2023.
45 sixes by Rohit in 2022.
41* sixes by Rohit in 2024.
Ro, The Greatest six hitter ever 🙇 pic.twitter.com/iucjv35nTv
— Johns. (@CricCrazyJohns) September 30, 2024
हे देखील वाचा: Most Sixes in Calendar Year Test: टीम इंडियाने कानपूरमध्ये रचला इतिहास, एका वर्षात 'इतके' षटकार मारून इंग्लंडचा 'विक्रम' काढला मोडीत
भारता अजूनही जिंकू शकतो सामना
मोमिनुल हकच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या, त्यानंतर टी-20 शैलीत फलंदाजी करत भारताने पहिला डाव नऊ विकेट्स 285 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 26 धावांत दोन विकेट गमावल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी लवकरात लवकर बांगालेदशला दुसऱ्या डावात ऑलआउट करुन मिळालेले लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. तेव्हात भारत हा सामना जिंकू शकतो. तसेच बांगलादेश हा सामना ड्राॅ करायचा पुरेपुर प्रयत्न करेल.