विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo by Michael Steele/Getty Image)

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) संघाशी दोन हाथ करण्यासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळतील. विश्वचषकनंतर हा भारतीय संघाचा हा पहिला दौरा आहे. विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर संघात विराट आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असे दोन गट पडल्याचे वृत्त समोर येत होते. पण दौऱ्याआधी विराटने पत्रकार परिषदेत याबाबाद स्पष्टीकरण दिले होते. आणि आता याबाबत प्रथमच उपकर्णधार रोहितने देखील भाष्य केले आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विराट कोहली याला धोनीसह अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी, वाचा सविस्तर)

'हिटमॅन' रोहित सध्या आपल्या सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. पण मोक्याच्या सामन्यात त्यांचे चाहत्यांची निराशा केली. त्यानंतर त्याच्या आणि विराट कोहलीमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात होते. आत वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरूवात होण्याआधी रोहितने मागील काही दिवसात झालेल्या घटनांवर मौन सोडले आहे. रोहितने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो म्हणतो, मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो. रोहितची ही पोस्ट महत्वाची मानली जात आहे. मॅगी काही दिवसात विराटसोबत त्याच्या दुराव्याबद्दल त्याचे हे स्पष्टीकरण कसल्याचे काहींचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, विराटने विंडीज विरुद्ध दौऱ्याआधी रोहितसोबतच्या वादाबद्दल आपले मत मांडले. विराट या वृत्तांचे खंडन करत म्हणाला की जर असे काही असते तर संघ विश्वचषकमध्ये इतकी चांगली कामगिरी करूच शकला नसता. पुढे तो म्हणाला कि तो ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ तयार करू शकत नाही. आणि अखेरीस पत्रकारांना ड्रेसिंग रुममध्ये येण्यास सांगितले.