टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या लांब षटकारांसाठी ओळखला जातो. रोहित शर्मा हा T20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्याकडे सर्वाधिक धावा आहेत. त्याने 136 सामन्यांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.32 च्या सरासरीने 3260 धावा केल्या आहेत. पण आता रोहित शर्माकडे टी-20 इंटरनॅशनलमध्ये आणखी एक विक्रम नोंदवण्याची उत्तम संधी आहे. विश्वचषकापूर्वी भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा फक्त दोन षटकार मारून नवा विक्रम करणार आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेत फक्त दोन षटकार मारून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनणार आहे. हा विक्रम सध्या न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे.
या यादीत तो 172 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत मार्टिन गप्टिलनंतर रोहित शर्माचा समावेश आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 171 षटकार मारले आहेत. या यादीत ख्रिस गेल हा T20 क्रिकेटमधील तिसरा सर्वात स्फोटक फलंदाज आहे. त्याने केवळ 79 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 124 षटकार मारले आहेत.
टीम इंडियाचा सामना होणार ऑस्ट्रेलियाशी
T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 T20 सामने खेळायचे आहेत. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने या दोन मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विराटशिवाय टीम इंडियाची टॉप ऑर्डरही बऱ्याच दिवसांपासून अपयशी ठरत आहे. वर्ल्डकपपूर्वी टॉप ऑर्डर फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे. या मालिकांमध्ये चांगला खेळ दाखवून टीम इंडियाला वेग पकडण्याची योग्य संधी आहे. भारताला 20, 23 आणि 25 सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहेत. तर 28 सप्टेंबर, 02 आणि 04 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहे. (हे देखील वाचा: India A Squad: भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी 'अ' संघाची घोषणा, संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची धुरा)
या दोन मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे
ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.