India National Cricket Team vs Australia National Cricket Team: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघाचा हा लाजिरवाणा पराभव होता. या सामन्यानंतर रोहित शर्माबाबत एक महत्त्वाचे अपडेट मिळाले आहे. एका रिपोर्टनुसार, रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडू शकतो. हा सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना खूप महत्त्वाचा असेल. (हेही वाचा - Rohit Sharma IND vs NZ: रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम! न्यूझीलंडकडून मालिका पराभवानंतर आली ही नामुष्की )
टीम इंडियाच्या पराभवाची जबाबदारी स्वतः रोहित शर्माने घेतली आहे. त्याने मुंबई कसोटीनंतर सांगितले की, कर्णधारपदासह मला चांगली फलंदाजी करता आली नाही. इकॉनॉमिक टाईम्समधील एका बातमीनुसार, रोहितने पर्थ कसोटीत खेळण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. वृत्तानुसार, रोहित म्हणाला, "मी पर्थ कसोटीत खेळणार की नाही हे मी अजून सांगू शकत नाही, त्यामुळे रोहित कसोटी टीम इंडियामधून ब्रेक घेऊ शकतो."
न्यूझीलंडविरुद्ध रोहितची खराब कामगिरी -
मुंबई कसोटीत न्यूझीलंडने भारताचा 25 धावांनी पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने 18 धावा केल्या होत्या. यानंतर तो बाहेर पडला. दुसऱ्या डावात तो केवळ 11 धावा करून बाद झाला. संपूर्ण मालिकेत रोहितची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याला 3 सामन्यात केवळ 91 धावा करता आल्या. विराट कोहलीचीही तीच अवस्था होती. कोहलीने 3 सामन्यात केवळ 93 धावा केल्या.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक -
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरपासून सराव सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंतप्रधान इलेव्हन आणि इंडिया अ यांच्यात होणार आहे. टीम इंडिया 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरी कसोटी खेळणार आहे. यानंतर तिसरी कसोटी ब्रिस्बेनमध्ये तर चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळवली जाईल. या मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे.