भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघामध्ये आज तिसरा T 20 सामना रंगणार आहे. चैन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगेल. दरम्यान आज भारताचा कर्णधार रोहित शर्माला दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. या विक्रमामुळे रोहित शर्माचाT 20 मध्ये अव्वल फलंदाजांच्या यादीमध्ये येणार आहे. त्यामुळे रोहित शर्माप्रमाणेच त्याच्या चाहत्यांमध्ये आजच्या सामान्याबद्दल खास कुतूहल आहे.
रोहित शर्माला नव्या विक्रमाची संधी
विराट कोहलीचा सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला आहे. आता त्याला जागतिक खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवायचे असेल तर आजच्या सामन्यात 69 धावा काढण आवश्यक आहे. यामुळे तो T 20मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरणार आहे. सध्या हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या नावावर आहे.
रोहितचा आजचा खेळ धडाकेबाज राहिला तर तो 'सिक्सर किंग' देखील होऊ शकतो. सध्याT 20 च्या कारकिर्दीमध्ये त्याने 96 सिक्सर लगावले आहेत. विक्रम मोडीत काढण्यासाठी त्याला अजून 8 सिक्सरची गरज आहे.
रोहितने ४ षटकार आणि १ चौकार ठोकल्यास आणखी एक विक्रम रोहितच्या नावावर होईल. जर रोहितने अशी कामगिरी केल्यास T२० मध्ये १०० षटकार आणि २०० चौकार लगावणारा रोहित हा जगातील दुसरा आणि पहिला भारतीय खेळाडू ठरेल.