मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) आज साप्ताहिक क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजीच्या (ICC Test Ranking) क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. रोहितने कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माशिवाय भारतीय संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनाही खूप फायदा झाला आहे. आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या तीन खेळाडूंचा टॉप-10 मध्ये समावेश आहे.
3 वर्षांनंतर रोहितचा टॉप-5 मध्ये प्रवेश
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला 3 वर्षांनंतर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये स्थान मिळवता आले आहे. रोहित शर्माला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच रोहित शर्मा आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे जर बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिटमॅनच्या बॅटने चांगली कामगिरी केली तर तो क्रमवारीत आणखी मोठी झेप घेऊ शकतो.
Sri Lanka’s spirits lifted further with a climb up the ICC Men's Test Player Rankings after a stunning triumph over England 🤩 #WTC25 | Read on 👇https://t.co/mPHlfVI9Y0
— ICC (@ICC) September 11, 2024
विराट आणि यशस्वीलाही झाला फायदा
रोहित शर्मा व्यतिरिक्त भारताचा महान फलंदाज आणि चाहत्यांचा आवडता विराट कोहलीनेही कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. विराटशिवाय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे तीन खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्व जैस्वाल हे टॉप-10 मध्ये आहेत.
आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 फलंदाज
जो रूट (इंग्लंड) – 899 गुण
केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 859 गुण
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) – 768 गुण
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 757 गुण
रोहित शर्मा (भारत) – 751 गुण
यशस्वी जैस्वाल (भारत) – 740 गुण
विराट कोहली (भारत) – 737 गुण
उस्मान ख्वाज (ऑस्ट्रेलिया) – 728 गुण
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – 720 गुण
मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) – 720 गुण